जुन्या पेन्शन योजनेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रॅलीचे आयोजन

कर्जतमध्ये रॅलीचे आयोजन

। नेरळ । वार्ताहर ।

1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या एकमेव मागणीसाठी कर्जतमधील सरकारी कर्मचार्‍यांनी कर्जत तालुक्यात बाईक रॅली काढली.

या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील सर्व सरकारी कर्मचारी संघटना, पदाधिकारी वर्गाने एकत्र येत कर्जत पंचायत समिती येथून निघालेल्या बाईक रॅलीत 400 हुन अधिक सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

पंचायत समिती मधून निघालेली मोटरसायकल रॅली कर्जत तहसील कार्यालयात पोहचली. या मागणीसाठी असलेल्या बाईक रॅलीत विजय जगताप, राजेंद्र फुलावरे, गोवर्धन माने, मोहन पाटील, सुभाष बुंधाटे, सचिन ठाकरे, सचिन शिंदे, विशाल धानके, अजय केंद्रे, संदीप गाढवे, करण सरक, डी.पी. कांबळे, रवी भारती, विजय चव्हाण, नीता गोरेगांवकर, शंकर थोटे आदी सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार शीतल रसाळ यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

माणगावमध्ये बाईक रॅली

। माणगाव । वार्ताहर ।

जुनी पेन्शन मंजूर करण्याबाबत केंद्र व राज्य शासन गंभीर नाही. केंद्र सरकाने पीएफआरडीए कायदा मंजूर केला आहे. राज्य शासनाकडे ही योजनाच बंद करून जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वाना लागू करा या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, रायगड जिल्हा माणगाव शाखेने (दि.21) सकाळी माणगाव जुने पंचायत समिती आवारात जमून माणगाव तहसील कार्यालयात बाईक रॅली काढून शासनाचे लक्ष वेधले. निवासी नायब तहसीलदार बी.वाय.भाबड यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, माणगाव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खाडे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महाराष्ट्र माणगाव शाखा सरचिटणीस तुषार सुर्वे, संजय चव्हाण, सुरेश पालकर, इंदापूर मंडळ अधिकारी श्री. गडदे, बुद्धकोश पवार, माधुरी उभारे, श्रीमती. तेटगुरे यावेळी आरोग्य, महसूल, वन विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुधागड पालीमध्ये जुनी पेन्शन लागू कराचा नारा

। सुधागड -पाली । वार्ताहर ।

सुधागड पाली येथे ही रॅली सकाळी 10 वा. सुरू झाली. तहसिलदार कार्यालय, येथे समारोप करण्यात आला. यावेळी सुधागड तालुका राज्य मध्यवर्ती संघटना सुधागड तालुका राज्य मध्यवर्ती संघटना अध्यक्ष जावेद जमादार, कमळेश गुंड, ज्ञानेश्‍वर बोडके, श्रीकांत इचके, श्रेया रावकर, सुनिता डाके, सरला क-हाळे, योगेश पवार,अमित यरवट, मच्छिंद्र शेवाळे, मोरे तात्या, खंकल, लक्ष्मी पाटील, दत्तगुरु सरनाईक,वारगुडे, मयेकर, ए.जी.खेडेकर, मयूर कारखानिस, ईश्‍वर पवार, सचिन केंद्रे, समाधान मराठे, यांच्यासह सर्व ग्रामसेवक तसेच मोरेश्‍वर कांबळे, राजेंद्र देसाई यांच्यासह सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version