रसिकांसाठी खुशखबर! उद्या राज्यस्तरीय ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन

। कोलाड । कल्पेश पवार ।
रोटरी क्लब ऑफ रोहा, सेंट्रल या संस्थे तर्फे ऑनलाईन राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन रविवारी (दि.29) सकाळी 10 :15 वाजता करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कैलाश जैन यांनी दिली.

कोरोना काळात एकत्र येणे शक्य नसल्याने हे राज्यस्तरीय कविसंमेलन ऑनलाईन घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या (डीजीएन) मंजू फडके, पुणे या उपस्थित राहणार आहेत. पुण्याचे प्रसिद्ध गजलकार, कवी विजय वडवेराव हे कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष पद भुषविणार आहेत.

रायगड, सांगली, मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, कणकवली, पुणे इ. विविध जिल्ह्यातील कवी कवयित्री या कवीसंमेलनासाठी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात सहभागी सर्व कवी कवयित्री यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि मानधन देवून रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल सन्मानित करणार आहे. आजच्या कठीण काळात हे कविसंमेलन म्हणजे खरोखर एक आनंदाची पर्वणी आहे.

या संस्थेने आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. हे संमेलन झुम अ‍ॅपवर घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रेसिडेंट रो कैलाश जैन, सेक्रेटरी रो.अजित तेलंगे, डिस्ट्रीक कल्चर चेअर रो. सुचीत पाटील तसेच या कार्यकमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख रो.विजय दिवकर तसेच सर्व रोट्रियन व रोट्रॅक टेक्नीकल विभाग हे मेहनत घेत आहेत .

Exit mobile version