रामदासस्वामींच्या पुण्यतिथी सोहळयाचे आयोजन

| पोलादपूर | वार्ताहर |

श्री क्षेत्र रामदासपठार येथील सुंदरमठ आनंदवनभुवन येथील समर्थ रामदासस्वामींच्या 343 व्या पुण्यतिथी सोहळयाचा शुभारंभ मंगळवारी (दि.27) फेबु्रवारीपासून सदगुरू अरविंद्रनाथ महाराज यांच्याहस्ते ब्रह्मध्वज पूजन आ. भरत गोगावले, राखी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दासनवमी महोत्सवानिमित्त शिवथरघळ सुंदरमठ परिसरामध्ये मंगल पहाट आरती, मनाचे श्लोक, दासबोध पारायण, प्रवचन आणि दुपारचे किर्तन, अन्नदान, महिलांचे भजन, हरिपाठ, रात्रीचे किर्तन आणि हरिजागर असे दररोज कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि.5) सकाळी 11 वाजता श्रीगुरूदेव अरविंदनाथ महाराजांचे प्रवचन झाल्यानंतर श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांची ग्रामप्रदक्षिणा रामदासपठार येथे होणार आहे.

दासनवमी सोहळयानिमित्त महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, पी. आर. सातव, संजय जगताप, अभियंता महेश नामदे, उपअभियंता सनारकर, प्रज्ञा खंडारे, मारूती आंधळे, विनोद माहुरे, रितेश फुलपगारे, सदगीरे, किसन भोसले, कृष्णा पवार आदींची उपस्थिती लाभणार आहे.

Exit mobile version