हरिनाम सोहळ्याचे आयोजन

| नेरळ | वार्ताहर |

वंजारपाडा येथे ग्रामस्थ मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन केले होते. या हरिनाम सोहळ्याचे 14 वे पुष्प असून 6 ते 9 मार्च या कालावधीत हा सोहळा आयोजित केला जातो. या हरिनाम सोहळ्यातील दीपोत्सव सोहळा महाशिवरात्रीच्या दिवशी आयोजित करण्यात आला होता. 200 हून अधिक महिलांनी डोईवर तुळस घेऊन शेकडो तरुणांच्या उपस्थितीत गाव प्रदक्षिणा आणि पालखी मिरवणूक काढली. यावेळी शिवराम तुपे, नागो गवळी, कृष्णा झोमटे, इंद्रजित ठाकूर, उत्तम शेळके, मेघा मिसाळ, काशिनाथ ठमके, एकनाथ धुळे, अमर मिसाळ, प्रसाद काष्टे, चिंधु भवारे, रामचंद्र भवारे, स्वाती विरले, आदेश धुळे आदी प्रमुख उपस्थित होते. दीपोत्सवाचे नेतृत्व नरेश पाटील यांनी केले.

Exit mobile version