उरणमध्ये हमारा गाव, ग्राम शिक्षा केंद्र

। उरण । वार्ताहर ।
समर कॅम्पचे औचित्य साधून कडापे या गावात ग्राम शिक्षा केंद्र सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत समितीचे सरपंच पाटील व उपसरपंच म्हात्रे, सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आदी मान्यवर उपस्थित होते. यानां कार्यक्रम प्रमुख भोजराज क्षीरसागर यांचे लाभले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्राम शिक्षा केंद्रासाठी सरपंच यांच्याकडून पुस्तके व उपसरपंच यांच्याकडून पुस्तके व बाकी गावात रॅली काढून गावकर्‍यांच्या माध्यमातून ग्राम शिक्षण केंद्रासाठी देण्यात आली. एकूण ग्राम शिक्षण केंद्रासाठी गावातून विविध स्थरातील वयोगटासाठी पुस्तके उपलब्ध झाली. यावेळी बोलताना सरपंच यांनी आपले मत व्यक्त केले की प्रथमच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या ग्राम शिक्षण केंद्राचे अजून मोठ्या स्वरूपात रूपांतर करण्याचे प्रयत्न करू असे सांगितले आहे.

Exit mobile version