संतापजनक! अल्पवयीन मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

| बीड | प्रतिनिधी |

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मंगळवार, 31 मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली असून, याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी एका 13 वर्षीय शाळकरी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठवड्याभरापूर्वीच डोंगर पिंपळा येथे एका 15 वर्षीय मुलाने आपल्याच नात्यातील चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच, ही दुसरी घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी 31 मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित चिमुरडी आपल्या घरामागील मोकळ्या मैदानात गेली होती. यावेळी गावातीलच आरोपी अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून, पीडितेच्या आईने बुधवारी 1 एप्रिल रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर बर्दापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version