अरुण पवार यांना पुरस्कार

| माणगाव | वार्ताहर |

माणगावमधील ज्येष्ठ पत्रकार अरुण पवार यांना तज्ञ विश्‍लेषक हेमंत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपक शिंदे स्मृती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. अरुण पवार हे गेली 35 वर्ष पत्रकारिता करीत असून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. सुरुवातीला झेप, फुलोरा दिवाळी अंक, शासन आपल्या दारी, आरोग्य आपल्या दारी, अरुणोदय अशी विविध प्रकारची पुस्तके प्रकाशित करून सामान्यांचे प्रश्‍न मांडले. ते लोकनेते अशोक दादा साबळे पतसंस्थेचे चेअमन असून शिपुरकर आणि वाघरे या इंग्रजी माध्यम शाळेचे चेअरमन म्हणून काम करीत आहेत.

Exit mobile version