सारा वर्तकची उल्लेखनीय कामगिरी

| पनवेल | प्रतिनिधी |

बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई शालेय निमंत्रित 25 मीटर जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या जलतरणपटूंनी प्रत्येकी सात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण 21 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स ॲकॅडमीची खेळाडू सारा वर्तक हिने 3 रौप्य आणि 2 कांस्य पदक मिळवून उल्लेखनीय कामगीरी केली आहे. तसेच, सारा वर्तक ही कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमधील सर्वात लहान जलतरणपटू आहे. अवघ्या 6 वर्षांच्या साराने बँकॉक येथे झालेल्या आशियायाई शालेय जलतरण स्पर्धेत भारतामधून महाराष्ट्र जलतरण संघाचे प्रतनिधीत्व करणाऱ्या स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले.

आशियायी जलतरण स्पर्धेत एकूण 14 राष्ट्रांच्या 600 जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 19 वर्षांवरील मुलांमध्ये इचलकरंजीच्या सर्वेश गुरवने 200 मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात कांस्यपदक पटकाविले. यानंतर त्याने 25 मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, तर 200 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक मिळवले आहे. तसेच, ठाण्याच्या राघवी रामानुजनने 3 सुवर्ण, 1 कांस्य, मुंबईच्या अथर्व म्हात्रेने 1 सुवर्ण, 1कांस्य, पुण्याच्या श्रीलेखा पारिखने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य, नंदिनी पेटकरने प्रत्येकी 1 रौप्य व कांस्य, शिवांशू कोर्तेने 1 रौप्य, अर्जुन नाईकने 1 कांस्य, ठाण्याच्या अर्जुन श्रीवास्तवने प्रत्येकी 1 सुवर्ण व रौप्य, तसेच, रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या सारा वर्तकने 3 रौप्य आणि 2 कांस्यपदकाची कमाई केली आहे.

Exit mobile version