पी.व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक!

जपानच्या अकाने यामागुचीवर सहज मात
टोकियो | वृत्तसंस्था |
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा 21-12, 22-20 असे सरळ सेटमध्ये नमवले.
सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी.व्ही. सिंधूला टक्कर देईल.

Exit mobile version