| उरण | वार्ताहर |
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार 8 सप्टेंबर रोजी अलिबाग येथे भाजप सरकार विरोधात जनसंवाद पदयात्रेचे माजी खा. सुरेश टावरे, जिल्हाअध्यक्ष महेंद्र घरत व सहप्रभारी श्रीरंग बरगे यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अलिबाग बस स्टँडपासून पुढे हुतात्मा स्मारकास अभिवादन करून बॅरिस्टर अंतुले भवन येथे या यात्रेचा शेवट करण्यात आला. यावेळी अंतुले भवन येथे सभा घेण्यात आली यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ॲड. प्रविण ठाकूर, पल्लवी रेणके, मिलिंद पाडगावकर, इस्माईल घुले, राजा ठाकूर, अबू खोत, मार्तंड नाखवा, अजगर दळवी, अखलाक शिलोत्री, शंभू म्हात्रे, पनवेल शहर वैभव पाटील, उमेश भोईर, सरोज डाकी, काका ठाकूर, सुनील थळे, निखिल डवले, आदित्य घरत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.