| दिघी | वार्ताहर |
दिघी – पुणे महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे पावसाळी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. मात्र, अशा घटनांनी प्रवाशांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. वडवली- दिघी मार्गावर कुडगाव रस्त्यावरील पाण्याची टाकी याठिकाणी शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळली. मुसळधार पाऊस व त्यात पोखरलेले डोंगर त्यामुळे मातीचा ढिगाऱ्यासह मोठी दगड रस्त्यावर आली. या घटने दरम्यान येथून कोणतेच वाहन गेले नसल्याने अनुचित प्रकार टळला आहे. दोन दिवस अतिवृष्टीने या मार्गावरील धोका वाढत आहे. याकडे संबधित खात्यांनी आपापली जबाबदारी ओळखून तिथे कोणताही अपघात होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यावी व या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक प्रवाशी करत आहेत.