| खांब | प्रतिनिधी |
गेल्या आठ दहा दिवसांपासून पाऊस एकाकी गायब झाल्याने भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पुढील काही दिवस पाऊस पडला नाही तर सुक्या दु्ष्काळाला सामोरे जावे लागते की काय अशीही भीती शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे. तर संपुर्ण जूलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व काही वेळेस दोन तीन वेळा मोठा पुर झाल्याने पुराच्या पाण्यामुळे भातशेती चांगलीच बहरली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतू श्रावण महिना सुरू झाला आणि चार पाच दिवसांनी पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने त्याचा परिणाम भातशेतीला झाल्याने भातशेतीत पाणीच नसल्याने जमीन सुकू लागल्याने भाताची रोपेही करपायला लागली आहेत.
प्रचंड मेहनत करून पिकविलेला भातशेती पावसाअभावी करपू लागल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.परिस्थिती अशीच राहिली तर मोठ्या दु्ष्काळाला सामोरे जावे लागते की काय अशीही भीती आता भेडसावू लागली असून वर्षभराच्या रोजीरोटीही प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी वर्गाचे संपुर्ण वर्षाचे गणितच बिघडणार आहे.