| खांब | प्रतिनिधी |
ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे व ग्लोबल इंडिया प्रा.लि.यांच्या संयु विद्यमाने आणि श्री विवेकानंद रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रोहा यांच्या स्थानिक सहकार्याने ‘पढाई से दोस्ती’ हा उपक्रम रोहा तालुक्यात यशस्वीपणे राबवण्यात आला. तालुक्यातील तळाघर, किल्ला, धाटाव, वरसे, सानेगाव या खेडे गावात पढाई से दोस्ती हा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे, त्यांचे वाचन, लेखन, श्रवण आणि बोलण्याचे कौशल्य विकसित करणे असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या शिबीरा प्रसंगी रामचंद्र म्हात्रे, डॉ. स्वप्नाली पाटील, राजू कुलकर्णी, निलेश पडवळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पुण्यातील प्रख्यात ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे ओंकार बाणाईत, प्रकाश रणानवरे, अविनाश काठवटे, सुरेखा नाटेकर यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमात श्री विवेकानंद रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोह्यमधील रिटा कशवालिया, प्रसाद भोईर, प्रसाद दगडे, किशोर तावडे यांचा सहभाग लाभला. या शिबिरात वरसे, देवकान्हे, उडदवणे, मुठवली, तळाघर, किल्ला, वाशी, धाटाव आणि खैरवाडी येथील सुमारे 120 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिराचे नियोजन पूजा जाधव, संपदा शिर्के, स्वप्नाली आकलेकर, तेजल नवशे आणि सानिका मोरे यांनी केले होते.
रोह्यात ‘पढाई से दोस्ती’ उपक्रम
