| लाहोर | वृत्तसंस्था |
पाकिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा 59 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. या मालिकेत पाकिस्तानसाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. तिसरा एकदिवसीय सामना जिंकताच पाकिस्तानच्या संघाने आयसीसी क्रमवारीत मोठी मजल मारली आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत पाकिस्तान संघाने पहिले स्थान काबीज केले आहे.
तीन एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर पाकिस्तान आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर-1 संघ बनला आहे. पाकिस्तानचे सध्या 118.48 रेटिंग गुण आहेत आणि ऑस्ट्रेलियाचे 118 रेटिंग गुण आहेत. दशांश संख्येत पाकिस्तान संघ पुढे आहे. पाकिस्तानचे 2725 आणि ऑस्ट्रेलियाचे 2714 गुण आहेत. याच कारणामुळे पाकिस्तानी संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. भारताचे 113 रेटिंग पॉइंट आहेत. एक दिवसीय क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. आशिया चषक स्पर्धेनंतर क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. या संघाने गेल्या वर्षी वेस्ट इंडिज आणि नेदरलँड्सचा 3-0 असा पराभव केला होता. यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 2-1 असा विजय मिळवला. आता अफगाणिस्तानविरुद्ध 3-0 ने जिंकलेल्या मालिकेने पाकिस्तानला क्रमवारीत पहिल्या स्थानावर कब्जा केला.