पाकिस्तानी गोलंदाजाने मोडला भुवनेश्वर कुमारचा रेकॉर्ड

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरने आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्या आमिर कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळत आहे. या लीगच्या एका सामन्यात त्याने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला. टी-20 मध्ये सर्वाधिक मेडन षटके टाकण्याच्या बाबतीत आमिरने भुवीला मागे टाकले आहे.

टी-20 मध्ये सर्वाधिक फेक मारण्याचा विक्रम सुनील नारायणच्या नावावर आहे. त्याने 522 सामन्यांमध्ये 30 मेडन षटके टाकली आहेत. तर बांग्लादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे. शाकिबने 444 सामन्यात 26 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. भुवनेश्वर कुमार तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता मोहम्मद आमिर तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने 302 सामन्यात 25 मेडन ओव्हरर्स टाकल्या आहेत. तर भुवीने 286 सामन्यात 24 मेडन षटके टाकली आहेत. जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. त्याने 233 सामन्यात 22 मेडन्स घेतले आहेत.

सीपीएल 2024 चा एक सामना बार्बाडोस रॉयल्स आणि अँटिग्वा यांच्यात खेळला गेला. मोहम्मद आमिर अँटिग्वा संघाचा भाग आहे. या सामन्यात अँटिग्वाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 176 धावा केल्या. या दरम्यान जस्टिन ग्रेव्हजने 61 धावा केल्या. तर बिलिंग्सने 56 लधावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात बार्बाडोसचा संघ केवळ 127 धावा करू शकला. पण तरीही बार्बाडोसने डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून हा सामना 10 धावांनी जिंकला. या सामन्यात आमिरने 2.3 षटके टाकली. यादरम्यान त्याने 11 धावा देत 1 मेडन ओव्हर टाकला. आमिरच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर ती कमालीची आहे. त्याने 302 टी-20 सामन्यात 347 विकेट घेतल्या आहेत. तर 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 71 विकेट घेतल्या आहेत. आमिरने 61 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 81 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 36 कसोटी सामन्यात 119 बळी घेतले आहेत.

Exit mobile version