पाली-कर्जत एसटी सुरू

चालक व वाहकांचे प्रवाशांनी केले स्वागत
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
राज्यभरात एसटी कर्मचारी यांचा आपल्या न्यायिक मागणीसाठी संप सुरू आहे. परिणामी ग्रामीण व शहरी भागातील नागरिक, विद्यार्थी, कामगार, रुग्ण आदी सार्‍यांच्याच प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या एसटीच्या संपाने जनमाणसाचे हाल व गैरसोय झाली. मात्र आता काही कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. पालीतून कर्जत एसटी सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशी प्रचंड आनंदी झाले आहेत. सोमवारी अनेक चाकरमानी व प्रवाशांनी बसमधून प्रवास केला व कामावर रुजू झालेल्या कर्मचार्‍यांचे आभार मानले.
तालुक्यातील पोंगडे महाराज व काही प्रवाशांनी चॉकलेट देऊन बस चालक व वाहकांचे स्वागत केले. ही बस सकाळी 11 वाजता पालीतून कर्जतला सुटते व पुन्हा तेथून पालीला येते.

Exit mobile version