मोकाट गुरांमुळे पालीकर हैराण

| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत हद्दीतील देऊळवाडी, बाजारपेठ आणि हटाळेश्‍वर चौक विभागात मोकाट जनावरांचा उच्छाद वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. या मोकाट जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पालीकर ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने गणपती मंदिर, हटाळेश्‍वर चौक, मुख्य बाजारपेठ, महाकाली मंदिर परिसर आणि पालीसह संपूर्ण सुधागड तालुक्यात रस्त्यावर दिवस-रात्र मोकाट गुरे ठाण मांडून असतात. जनावरांचे मालक व नगरपंचायत प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. मोकाट गुरांच्या वावरामुळे गल्लीबोळीत, रस्त्यावर शेणाचे साम्राज्य पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपंचायत प्रशासनाने मोकाट गुरांना कोंडवाड्याचा रस्ता दाखवून ग्रामस्थांना त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ होत आहे.

Exit mobile version