भाताण हायस्कूलमथ्ये अवतरली पंढरी


। सुतारवाडी । वार्ताहर ।
रविवार 10 जुलै 2022 रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय भाताण येथे दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ज्ञानोबा, तुकारामच्या गजरात शालेय परिसर दुमदुमून गेला. टाळ, मृदुंगाच्या तालावर नाचत, फुगड्या खेळत संपूर्ण गावातून शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण पायी दिंडी काढली. या दिंडी सोहळ्याचे भाताण ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले व या सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले. हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशांत मोकल , देवयानी मोकल, सारीका उकिरडे,मनिषा खडालीकर, गणेश दुर्गे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या दिंडी सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन गणेश दुर्गे यांनी केले.

Exit mobile version