। पंढरपूर । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचा अधिवेशन सोहळा पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते हळूहळू येऊ लागले आहेत. बोलता बोलता संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी गजबजून गेला आहे.
अबाल वृद्धांपासून अनेक कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले असून संपूर्ण परिसरात लाल झेंडे व पताका लावल्याने संपूर्ण परिसर लाले लाल झाला आहे. एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. आता काही वेळातच अधिवेशन सुरू होणार असून शेकाप नेते जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.







