पंडित पाटील यांनी घेतली शरद पवाराची भेट

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट माजी आमदार पंडित पाटील यांनी बुधवारी घेतली. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण कार्यालयात दोन नेते भेटले.

राजकीय घडामोडी आणि रायगड जिल्ह्यातील राजकीय परस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी होणाऱ्या सर्व निवडणुका इंडियाच्या माध्यमातून लढवण्याबाबत सर्वच पक्षाचे एकमत झाल्याने सदरची भेट खूप महत्वाची मानली जात आहे. राजकीय बलाबल व निवडणुका जिंकण्यासाठी केलेली व्यूहरचना या विषयी पवार यांना सविस्तर माहिती दिली. लवकरच श्रीवर्धन येथे एक मोठी जाहीरसभा याच महिन्यात होणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी माजी आमदार पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे.

Exit mobile version