पनवेल मनपा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच

प्रारूप प्रभागाची भौगोलिक सीमा रचना जाहीर
| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महापालिकेची सन 2022 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागाची भौगोलिक सिमा रचना सोमवारी जाहीर करण्यात आली असून त्यावर 24 जून पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत पनवेल महपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणुक सन 2022 मध्ये होणार आहे . त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचने प्रमाणे प्रारूप प्रभागाची भौगोलिक सिमा रचना सोमवार 13 जून रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये 89 नगर सेवकांसाठी 30 प्रभाग आहेत. त्यापैकी 29 प्रभागातून प्रत्येकी 3 प्रतिनिधी तर एका प्रभागातून 2 प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. या जाहीर झालेल्या प्रभाग रचने बाबत हरकती व सूचना शुक्रवार 24 जून दुपारी 3 वाजे पर्यन्त महापालिका आयुक्तांकडे निवडणूक कार्यालयात दाखल करावयाच्या आहेत. हरकती व सूचना दाखला करणार्यांना त्याबाबत सुनावणीसाठी हजर राहणे बाबत स्वतंत्र कळविण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना नकाशा, अधिसूचना, प्रभागांची व्याप्ती व चतु:सीमा महापालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर, महापालिका मुख्यालयात व प्रभाग कार्यालयात पहाण्यासाठी उपलब्ध आहेत.

लोकसंख्या 5,09,901
एससी – 37,923
एसटी – 17,727
एकूण नगरसेवक – 89
एकूण प्रभाग – 30 29
प्रभागातून प्रत्येकी – 3
एका प्रभागातून – 2

Exit mobile version