। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वे पोलिसांनी सोमवारी (दि.29) समयसूचकता दाखवीत एका प्रवाशाचा जीव वाचवल्याची घटना घडली. रेल्वे स्थानकात सकाळी आलेला प्रवासी नितीन खरात (रा. ऐरोली) हा तेथील पोलीस चौकीसमोर आला असताना अचानकपणे त्याच्या छातीत दुखू लागले. तसेच तो खाली कोसळला. त्यावेळी तेथे कार्यतत्पर असलेले रेल्वे पोलीस अधिकरी रण शेवरे, अशोक गोपाळे, पोलीस हवालदार जगदाळे, पटेल, माने यांनी तात्काळ धाव घेऊन इसमास प्रथमोपचार देऊन त्याला छातीवर पंपिंग करून शुद्धीवर आणले. तसेच पुढील औषधोपचारासाठी त्याला हॉस्पिटल येथे रवाना केले आहे.