पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला धर्माधिकारी यांचे नाव द्यावे

छावा क्रांतिवीर सेनेची मागणी

| बोर्ली पंचतन | वार्ताहर |

पनवेल येथे नव्याने कार्यान्वित झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाला महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय असे नाव देण्याची छावा क्रांतिवीर सेनेच्या रायगड पदाधिकार्‍यांनी केली आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन उपजिल्हा रुग्णालय, तहसील, महानगरपालीका, जिल्हा वैद्यकीय अधिकारी अलिबाग या कार्यालयांना देऊन यावर तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष रोशन पवार, जितेंद्र ठाकूर, स्वप्नील घरत, अनंत कोंदिलकर यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या रेवदंडा येथील निवास्थानी सदिच्छा भेट घेऊन सदर मागणीच्या निवेदनाची प्रत सादर केली. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये करीत असलेल्या विविध सामाजीक कार्याचे कौतूक करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version