पनवेलचे जलतरणपटू कर्नाटकात चमकले

हसन शेख, सनी टाकने पटकावली पदके


| पनवेल | वार्ताहर |

पनवेलमधील दोन जलतरणपटूंनी विविध प्रकारांमध्ये पदके पटकावून पनवेलचे नाव उंचावले आहे. रायगड जिल्ह्यातील दोन जलतरणपटू हसन शेख (25) आणि सनी राजेश टाक (28) यांनी येम्मकेरे येथे कर्नाटक जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या भारतीय जलतरण महासंघाने संलग्न असलेल्या 19 व्या राष्ट्रीय मास्टर्स चॅम्पियनशिप 2022-23 मध्ये भाग घेतला. ही स्पर्धा 24 ते 26 नोव्हेंबरदरम्यान जलतरण तलाव, मंगळुरु, कर्नाटक येथे संपन्न झाली. या स्पर्धेत हसन शेखने 100 मीटर बटरफ्लाय इव्हेंट आणि 4×50 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली. तर, सनी राजेश टाकने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि 4 x 50 मीटर फ्रीस्टाइल रिले स्पर्धेत अनुक्रमे एक कांस्य आणि एक सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version