दिवाळी पहाटला पनवेलकरांचा प्रतिसाद

| पनवेल | वार्ताहर |

मंदार काणे एंटरटेनमेंट आणि प्रिया इव्हेंट्स आयोजित फडके नाट्यगृह पनवेल येथे झालेल्या आमचं ठरलंय या दिवाळी पहाट प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या कार्यक्रमासाठी रसिकप्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला. या वेळी पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, विक्रांत पाटील, केदार भगत, महेंद्र घरत, प्रथमेश सोमण, मयूर निजामपूरकर, पुष्कर कर्वे, माधुरी गोसावी या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे मंगला खाडिलकर यांनी सूत्रसंचालन केले. तर संपूर्ण वादकांची टीम अमेय ठाकूर देसाई यांची होती. त्याचसोबत उत्तम ध्वनि व्यवस्था सर्वेश गोखले आणि नाट्यगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल नाट्यगृह व्यवस्थापक राजेश डोंगरे आणि पनवेल महानगरपालिका तसेच सर्व पत्रकार मान्यवर मंडळी आणि रसिकप्रेक्षकांचे मंदार काणे यांनी आभार मानले.

Exit mobile version