नगरसेवक राजू सोनी यांच्याकडून पार्किंगचे फलक

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी स्वखर्चाने सम-विषम पार्किंगचे फलक उभारुन दिले आहेत. शहातील वासुदेव बळवंत फडके या नवीन झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सम व विषम पार्किंगचे फलक नसल्याने लोक आपली वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग करत असल्याने येथे नेहमी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे अनेक वेळा लोकांमध्ये भांडणेसुद्धा होत होती. हे सर्व स्थानिक नगरसेवक राजू सोनी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेचच सम व विषम तारखेचे 9 फलक स्वखर्चाने बनवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावून दिल्यामुळे सतत होणार्‍या वाहतूक कोंडीचा मार्ग मोकळा करुन दिला. त्यामुळे येथील नागरिकांनी व वाहतूक पोलिसांनी राजू सोनी यांचे आभार मानले.

Exit mobile version