पर्युषण पर्वाची मिरवणुकीने सांगता

| कर्जत | वार्ताहर |

जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाची आज सांगता झाली. या निमित्ताने कर्जत शहरातील जैन बांधवांनी भगवान महावीरांच्या मूर्तीची कर्जत शहरातून मिरवणूक काढली व जैन मंदिरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने जैन बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

जैन साध्वीजी विकसित माला यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणूक ही जैन मंदिरपासून सुरू होऊन रेल्वे स्टेशन व पोस्ट जवळून आंबेडकर पुतळा जवळ मस्जिद ते जैन मंदिर अशी काढण्यात आली. याप्रसंगी जैन समाजाचे अध्यक्ष अजित ओसवाल, दिनेश जैन, किरण जैन, मुकेश जैन, भरत सोलंकी, अरविंद जैन, संजय ओसवाल, जयंतीलाल परमार, प्रकाश जैन, साजन ओसवाल, राजेश सोलंकी, प्रमोद परमार, राजू परमार, पंकज ओसवाल आदींसह जैन बांधव व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version