पॅसेंजर ट्रेन थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी रेल्वे स्टेशनवर सकाळी 7.45 च्या सुमारास दिवाहून सावंतवाडी जाणारी पॅसेंजर आणि दुपारची 12.30 च्या सुमारास रत्नागिरी-दिवा ही पॅसेंजर येथे थांबत नसल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

दरम्यान, पाताळगंगा औद्योगिक परिसर, बीपीसीएल कंपनी, इस्रो कंपनी, तसेच पिल्लये कॉलेज व इतर शाळा असल्याने नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करीत आहेत. लॉकडाऊन अगोदर नियमितपणे रेल्वे रसायनी रेल्वे थांब्यावर थांबत होत्या. सध्या रसायनी थांबा घेतच नसल्याने सदर रेल्वे रसायनी थांब्यावर थांबविण्यात याव्यात, असे रेल्वे प्रशासनाला नागरिकांतून मागणी होत आहे. तसेच ज्या रेल्वे थांबत आहेत, त्यांचे तिकीट मिळण्याची सोयही इथे उपलब्ध नसल्याने पनवेल इथे पकडले गेल्यास फुकट भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच रसायनी ते पनवेल हे प्रवासी भाडे 10/ रु. तरी कोरोना काळात स्पेशल ट्रेनसाठी लावलेले 30 रुपये भाडे अजून, तसेच असल्याने प्रवाशांना नाहक जास्तीचे भाडे सोसावे लागत आहे. हे वाढलेले भाडेवाढ त्वरित मागे घ्यावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Exit mobile version