पी.डी.जी.पी.क्रिकेट ट्रॉफीचे अनावरण संपन्न

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल येथे पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिस आयोजित क्रिकेट सामन्याच्या ट्रॉफीचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. गुणे यांनी सांगितले की, क्रिकेटमुळे सांघिक भावना टिकवल्या जातात, यामुळे मैत्री घट्ट होते. आपण या परिसरातील सर्व एकत्र येऊन पनवेल उरण डॉक्टर फेडरेशनची स्थापना करावी, यामुळे तुमची ताकद वाढेल आणि पुढील काळात येणार्‍या समस्या समर्थपणे सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल असे सांगितले.

या प्रसंगी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, डॉ.विकास डोळे, पी.डी.जी.पी चे अध्यक्ष डॉ.वैभव मोकल, सचिव डॉ. रवींद्र राऊत, उपाध्यक्ष डॉ.सागर चौधरी, खजिनदार डॉ.संदेश बहाडकर, डॉ.सागर ठाकूर, डॉ.सिद्धार्थ कौशिक, डॉ.सचिन पाटील, डॉ.सुदर्शन मेंटकर, डॉ.अनघा चौहान, डॉ.सोनल शेठ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले, आपण सर्वांनी कोरोनाचा प्रभाव असताना खूप मेहनत घेतली याचा अभिमान आहे, आम्ही आपल्यासोबत आहोत.

यावेळी प्रत्येक संघाचे कर्णधार उपस्थित होते. यामध्ये पुरुष संघ तळोजा टायगर्स, उलवे युनायटेड, पनवेल वारीयर्स, खांदा कॉलोनी, करंजाडे लायन्स, कामोठे दबंग, खारघर फोनिक्स, खारघर वारियर्स, पनवेल स्ट्रायकर्स, कर्नाळा वारियर्स आणि महिला संघ पनवेल रेंजर्स, पनवेल स्ट्रायकर्स, रसायनी लायन्स, कर्जत अथेना वारियर्स, रोहा रॉयल्स, आदी उपस्थित होते.

Exit mobile version