| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील मानाची पालखी म्हणून समजली जाणारी ओम साई मित्र मंडळाची पालखीने सोमवार (दि.20) रोजी पूर्ण पेण शहर साईमय करून टाकला होते. साई मंदिर कासार तलाव पेण येथून रविवार (दि.19) रोजी सायंकाळी सात वाजता विद्युत रोशनाईत संगीताच्या तालावर पालखीला प्रारंभ झाला. या पालखीमध्ये तीन चलचित्र रथ सहभागी झाले होते. यामध्ये बैलगाडी हाकताना साईबाबा, द्वारकामाई मंदिर प्रतिकृती, तसेच विद्युत रोशनाईत नाहुन गेलेले छत्तर यांचा समावेश होता.
साई मंदिरापासून सुरू झालेली पालखी सोहळा तेरा घरांची आळी, आंबेडकर चौक, पेण नगरपालिका चौक (कोतवाल चौक), राजू पोटे मार्ग कोळीवाडा नाका, खाटीक आळी, महाविर मार्ग, शिवाजी चौक, कासार आळी, हनुमान आळी, चावडी नाका आणि पुन्हा साई मंदिर या मार्गे पालखी फिरवण्यात आली. या पालखीसाठी हजारोंच्या संख्येने पेणकर सहभागी झाले होते. 19 तारखेला रात्री 10 वाजेपर्यत पालखी पेण शहरात फिरली. त्यानंतर सोमवारी पहाटे सहा वाजता ही पालखी शिर्डीकडे मार्गस्थ झाली. पेणवरून निघालेली पालखी 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पालखी शिर्डीत पोहोचणार आहे असे आयोजकांनी सांगितले आहे. हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे सर्वेसर्वा कल्पेश ठाकूर गेली महिनाभर अहोरात्र मेहनत घेत आहेत.