पादचार्‍याला कंटेनरची धडक

| पनवेल | वार्ताहर |

रस्ता पार करणार्‍या 57 वर्षीय इसमाला कंटेनरने धडक दिली. या धडकेत रामराव आडे हे जखमी झाले. कंटेनर चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामराव आडे हे बॉयलर चिकन सप्लायर आहेत. ते बोलेरो वाहनात बॉयलर चिकन भरून पुणे येथून पनवेल करता निघाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास कोनगाव येथे रस्त्याच्या पलीकडे असलेल्या चिकन विक्रेत्याला बॉयलर कोंबडी विक्री बाबत विचारणा करण्यासाठी ते रस्ता पार करत होते. त्यावेळी महाराष्ट्र स्वीट आणि फरसाण मार्ट कोनगाव या दुकानाच्या समोरील रस्त्यावर भरधाव वेगाने कंटेनर आला आणि त्याने रामराव आडे यांना धडक दिली. यात ते खाली पडून जखमी झाले. मात्र, कंटेनर चालक धडक देऊन पुण्याच्या दिशेने पळून गेला.

Exit mobile version