पेण कृउबा निवडणुकीत चुरस

आज होणार अधिकृत उमेदवार
| पेण | वार्ताहर |
पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी अर्ज छाननीच्यावेळी शेकाप विरुद्ध भाजप उमेदवारांनी परस्परांवर विविध हरकती घेण्यात आल्याने उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होऊ शकली नाही. बुधवारी सकाळी उमेदवारी अर्जांची छाननी बाजार समितीच्या कार्यालयात सुरु झाली.मात्र शेकाप प्रणित महाविकास आघाडीतर्फे अ‍ॅड.मानसी म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जोरदार युक्तिवाद करीत विरोधी भाजप उमेदवारांबाबत आक्षेप नोंदविले.

दोन्ही बाजूनकडून उमेदवारांवर हरकती घेतल्या गेल्या त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहचत होती. कोणाचा अर्ज वैध होतोय की कुणाचा अवैध याबाबत सार्‍यांमध्ये उत्सुकता लागली होती. मात्र, निवडणूक अधिकारी सुभाष काळे यांनी दोन्ही बाजुंचे म्हणणे लेखी स्वरुपात सादर करुन घेतले.त्यावर कोणताही निर्णय बुधवारी घेतला नाही.त्याबाबत गुरुवारी निर्णय घेतला जाणार आहे.

Exit mobile version