किकबॉक्सिंग स्पर्धेत पेण तालुका प्रथम

| खरोशी । वार्ताहर ।
पनवेल खांदा कॉलनी येथील रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनने जिल्हास्तरिय किकबॉक्सिंग निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पेण तालुक्यातील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन ह्या संस्थेत रविंद्र म्हात्रे, विनायक पाटील तसेच प्रथमेश मोकल ह्यांच्याकडे किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आसलेल्या विद्यार्थ्यांनी 45 गोल्ड मेडल, 43 सिलव्हर मेडल, 18 ब्रांझ मेडल पटकाऊन प्रथम क्रमांकाच्या चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकविण्याचा मान मिळविला. ह्या सर्व विजयी खेळाडूंचे पुणे आळंदी येथे होणार्‍या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूना महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोशिएशनचे उपध्यक्ष मंदार पनवेलकर ह्यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. ह्या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ह्या स्पर्धेचे आयोजन निलेश भोसले ह्यांनि केले. तर जिल्ह्यातुन प्रशांत घांगुर्डे, चिंतामणी मोकल, सागर कोळी , प्रतिक कारंडे, संजय पाटील, शैलेश खोबरागडे, संजय गमरे, स्वपनिल वारंगे, ह्या सर्व प्रशिक्षकांनी आपआपल्या तालुक्यातुन खेळाडूंना खेळण्यासाठी आणले होते

Exit mobile version