पेण तालुक्यात गोधन चोरीत वाढ

indian dairy farming, indian cattle

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यासह रायगड जिल्हयात गोधनाच्या चोर्‍या वाढल्या आहेत. विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानच्या विनोबा आश्रम गोशाळेतील मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत चार गाई चोरीस गेलेल्या आहेत. पेण पोलिस ठाण्यात व विभागीय पोलिस अधिकारी पेण यांच्याकडे विनोबा भावे आश्रमाचे व्यवस्थापक विजय दिवाण व नीला आपटे यांनी पेण पोलिस ठाण्यात लेखी देखील तक्रार केली आहे. परंतु, या गोधन चोरांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने गोधन रानात सोडायचे की नाही हा मोठा प्रश्‍न गोधन मालकांच्या मनात निर्माण झाला आहे. हे गोधन चोर रानातूनच गाई, बैल लंपास करीत आहेत. तरी या वारंवार होणार्‍या चोर्‍यांना आळा घालणे गरजेचे आहे.

Exit mobile version