पेन्शनर अधिवेशवन उत्साहात

| अलिबाग | प्रतिनिधी |
ऑल इंडिया सेंट्रर गव्हर्मेंट पेन्शनर असो. पुणे, शाखा अलिबाग संघटनेचे दहावे अधिवेशन अलिबागमधील कर्णिक हॉल येथे सोमवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.जी. आपटे हे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनरल सेक्रेटरी श्री. मनोहर पत्की, बी.एन. क्षीरसाट व बी.बी. खरिवले व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गतवर्षात निधन झालेल्या कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कामकाजास सुरुवात करण्यात आली. संघटनेचे सचिव ए.पी. म्हात्रे यांनी मागील वर्षाचे इतिवृत्त व जमाखर्च सादर केला. त्यास सर्वांनी मंजुरी दिली. दरम्यान, नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये व्ही.बी. म्हात्रे यांची अध्यक्षपदी, तर जे.डी. पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत कोणताच बदल करण्यात आला नाही. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए.डी. बिर्जे, सुरेश खडपे, रमेश ठाकूर, राणे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.आर. पाटील यांनी केले.

Exit mobile version