। तळा । वार्ताहर ।
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील ‘युथ फॉर माय भारत आणि डिजीटल लिटरसी’ या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरुन विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज बँक ऑफ इंडिया तळा शाखेचे बँक प्रतिनिधींनी वाघमारे यांनी श्रमदान शिबीरास अचानक भेट दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे जगन्नाथ तांडेल यांनी तळा तालुक्याला दुर्गम भाग म्हणून ओळखलं जातं पण मी असे म्हणेन की हा तालुका दुर्गम नसुन तालुक्यातील माणसं दुर्गम बनत चालली आहेत अशी खंत व्यक्त केली आणि बँक ऑफ इंडिया सारख्या नामांकित बँकेने आमच्या गावातील अंगणवाडीत व शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी गावात बँक खाते उघडण्यासाठी कॅम्प आयोजित करावा अशी विनंती केली. याप्रसंगी भांजी मेंदाडकर, यशवंत खांजी, लक्ष्मण खालू, माया बेडेकर, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ दत्ता कुंटेवाड, प्रा.भरत चाळके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.