। अबुधाबी । वृत्तसंस्था ।
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2025 साठी संघातून रिलीज केलेल्या इंग्लंडच्या फिल सॉल्टने अबुधाबी टी-10 लीगमध्ये स्पोटक खेळी केली आहे. अबुधाबी संघाकडून खेळताना अजमान बोल्ट्स संघाविरूद्ध सॉल्टने अवघ्या 18 चेंडूत 52 धावांची खेळी करत जलद अर्धशतक पुर्ण केले. ज्यामध्ये त्याने एका षटकात 34 धावा करत धुव्वाधार कामगिरी केली आहे. अजमान बोल्ट्स संघाच्या 79 धावांच्या प्रत्युत्तरात अबुधाबी संघाने 81 धावा केल्या आणि 9 गडी राखून सामन्यात बाजी मारली आहे.
दरम्यान, अजमान बोल्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करत 10 षटाकांमध्ये 8 गडी गमावत 78 धावांची खेळी केली. ज्यामध्ये अजमान बोल्ट संघाचा सलामी फलंदाज शेवॉन डॅनियल याने चांगली फलंदाजी करत होता. पण, दुसर्या बाजूने बोल्ट्स संघाचे आगामी फलंदाज स्वस्तात परतत होते. आगामीचे 4 फलंदाज एक अंकी धावा करून तंबूत परतले. तर, सलामीवीर शेवॉन डॅनियलने 3 चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने 10 चेंडूत 22 धावांची खेळी केली. सहाव्या क्रमांकावर फंलदाजीसाठी आलेल्या रवी बोपारानेही 3 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 23 धावा उभारल्या. साथीदार स्नेहान जयसुर्याने 8 चेंडूत 10 धावांची नाबाद खेळी केली. तर, पुढील तिन्ही खेळाडू अशा अवघ्या 8 धावा करू शकले. अबुधाबी संघाच्या गोलंदाजांनी बोल्ट्स संघाचा डाव 79 धावांवर गुंडाळला आणि जिंकण्यासाठी 80 धावांचे आवाहन स्वीकारले.