फोटो – व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; 5 आरोपींवर गुन्हा दाखल

। माणगाव । प्रतिनिधी ।
फोनवर पैशाची मागणी करीत फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी यांतील पाच आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स दरचा गुन्हा सोमवार दि.23 एप्रिल 2022 रोजी ते 29 मे 2022 पर्यंत वेळोवेळी रॉयल पॅलेस हॉटेल माणगाव येथे घडला.या घटनेची फिर्याद लेखपाल कान्हाराम सवामी (वय-39) रा.तांबट आळी, महाड मूळ रा.असपुरा राज्य राजस्थान यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
आरोपी किशोर मुरकर, इस्माईल,सौरभदादा,व दोन महिला (पूर्ण नाव,गाव पत्ते माहित नाही) यांनी रॉयल पॅलेस हॉटेल माणगाव येथे फिर्यादी लेखपाल कान्हाराम सवामी व महिला आरोपी क्र.पाच हिच्यासोबत एकत्र रूम मध्ये फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पोलीस असल्याचे सांगून फिर्यादीला जबरदस्तीने गाडीमध्ये घेऊन मारहाण करीत इंदापूर येथे नेऊन फिर्यादीकडे पाच लाख रुपयाची मागणी केली.त्यापैकी 21 हजार रुपये गुगल पे ने ट्रान्स्फर करून घेतले.तसेच त्यानंतर वेळोवेळी फिर्यादी यांना फोनद्वारे पैशाची मागणी करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
या गुन्ह्याची माहिती मिळताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करीत आहेत

Exit mobile version