| पुणे | वृत्तसंस्था |
शिरुर परिसरात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस पाटलाच्या 15 वर्षांच्या मुलीने पिकअप गाडीने एका बाईकस्वाराला उडवले. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
शिरुर तालुक्यातही एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन (15) मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहू पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेले. या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा गंभीररित्या जखमी झाला आहे.
लेंढे कुटुंबीय मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होते. यावेळी गाडीमध्ये आई-वडील, मुलगा आणि मुलगी होते. पिकअप अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी चालवत होती. तिच्यासोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष लेंडे बसले होते. मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरुन धडक देऊन अपघात झाला आहे. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







