Panvel Accident: पिकअपची ट्रेलरला धडक

एकाचा मृत्यू, चौघेजण जखमी

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पिकअपने पुढे जाणाऱ्या ट्रेलरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक जयपाल खोपटकर (रा. दिघी श्रीवर्धन) याचा मृत्यू झाला, तर चौघेजण जखमी झाले. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात दोन जून रोजी करण्यात आली.

दोन जून रोजी मध्यरात्री 12 च्या सुमारास डोंबाला कॉलेज, पनवेल समोरील ब्रिजवर पळस्पे ते जेएनपीटीकडे जाणाऱ्या लेनवर पिकअप क्रमांक एमएच 06 बी डब्ल्यू 6101 वरील चालक जयपाल हाश्या खोपटकर यांनी पिकअप भरधाव वेगाने चालवला आणि पुढे जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक एमएच 16 सीसी 2979 याला पाठीमागून जोरात धडक दिली. या झालेल्या अपघातात जयपाल खोपटकर गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर पिकअपमधील कृष्णा लक्ष्मण चिकाटी, काशिनाथ भानगोजी, कमलाकर लक्ष्मण चिकाटी, अविनाश रामदास गुंड हे चौघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version