खा. सुनिल तटकरेंनी केली पाहणी
संबधित अधिकार्यांना घेतले फैलावर
। माणगाव । प्रतिनिधी ।
सध्या माणगाव – पुणे दरम्यान अनेक ठिकाणी वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने वन विभागाकडून परवानगी येई पर्यत रखडले होते. मात्र परवानगी येवून सुद्धा या रस्त्यातील काही भाग सुटला असून त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यासाठी खा.सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांना लेखी निवेदन देत प्रत्यक्ष भेटून चर्चा करून प्रश्न मांडला होता. याची तत्काळ दखल घेऊन खा. तटकरे यांनी एमआरडीसीचे कार्यकारी अभियंता निफाडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव उपअभियंता श्रीकांत गणगणे व संबधित अधिकारी प्रत्यक्ष यांना जागेवर जाऊन पाहणी करून हे काम तत्काळ हाती घेण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, उपसरपंच राजेश्री निजापकर, शिवसेना निजामपूर माजी विभागप्रमुख विद्यमान सदस्य प्रसाद गुरव, युवानेते मिलिंद फोंडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळाराम दबडे, निजामपूर विकास आघाडीचे जेष्ठ नेते मारुती कासार, राष्ट्रावादी कॉ नेते घनश्याम तटकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.