पालिकेच्या परवानगीशिवाय फलकाचे काम

| पनवेल | वृत्‍तसंस्था |

घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच पनवेल पालिका हद्दीत अवाढव्य जाहिरात फलक उभरण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे रेल्वेच्या परवानगीने सुरु असलेल्या या कामासाठी पनवेल पालिकेच्या परवानगीची गरज नसल्याची माहिती जाहिरात फलक उभरणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली असून, पनवेल पालिकेच्या परवाना विभागाचे अधिकारी जयराम पादीर यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.

13 मे रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर जाहिरात फलक कोसळून 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने राज्यातील सर्वच जाहिरात फलकांचे स्ट्रकचरलं ऑडिट करण्याचे निर्देश देऊन कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक प्राधिकर्नांना दिले होते. प्रशासनाच्या निर्देशनुसार पनवेल पालिका हद्दीत देखील स्ट्रकचरल ऑडिट सादर न करू शकलेल्या जाहिरात फालकांवर तोडक कारवाई करण्यात आली. तसेच उरर्वरित जाहिरात फलक लावणाऱ्या कंपन्यानां योग्य कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. एकीकडे पालिका प्रशासनाकडून अवाढव्य फलकावर कारवाई सुरु असतानाच पालिका हद्दीतच पालिकेच्या परवानगी शिवाय रेल्वेच्या मंजुरीने जाहिरात फलक उभरण्याचे काम सुरु करण्यात आल्याने रेल्वेला घाटकोपर दुर्घनेशी कोणतेही देणे घेणे नसल्याचे उघड होत आहे.

Exit mobile version