चौल-पाझर येथे वृक्षारोपण

। अलिबाग । प्रतिनिधी ।

चौल-पाझर येथेे कृषक कल्याणकारी संस्था चौल आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. या स्तुत्य उपक्रमास कृषक कल्याणकारी संस्था चौल यांना रेवदंडा जेष्ठ नागरिक संघ व निसर्गप्रेमी संस्था चौल यांचे श्रमदान व विशेष सहकार्य लाभले.

दरवर्षीप्रमाणे चौल कृषक कल्याणकारी संस्थेच्यावतीने दि.30 जुन रोजी चौल-पाझर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वृक्षारोपण कार्यक्रमाला एम.डी. तायडे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. तसेच, कृषक कल्याणकारी संस्था चौल, रेवदंडा जेष्ठ नागरिक व चौल निसर्गप्रेमी संस्था सोशल मिडिया ग्रुप यांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी आवळा, कंरज, चिंच, खैर, जांभूळ, वड, भावाह, काजू, आपटा, आदी एकूण 100 रोपांची लागवड करण्यात आली.

Exit mobile version