तेजस्विनी फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

। पनवेल । वार्ताहर ।
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन अलिबागच्या पनवेल शाखेतर्फे हुतात्मा स्मारक उद्यान रोटरी क्लब येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन रायगड सचिव राखी पाटील, विजय पाटील, शैलेश घरत, सुनीता रास्वे, नेहा गिर्‍हे, सिद्धिका तांबोळी, संजय मौर्य, अरविंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होते. युवापिढीने सदर उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. झाडे लावा,झाडे जगवा ब्रीद हे पाळू, लावून एक रोपटे ग्लोबल वॉर्मिंग टाळू असे संदेश देणारे फलक दर्शवून तेजस्विनी फाऊंडेशनने जनजागृती केली.

Exit mobile version