| गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील कोलाड रोहा लायन्सक्लबच्या वतीने चिल्हे व तळवली येथील जंगल डोंगर भागात विविध प्रकारच्या सातशे ते आठशे वृक्षांच्या बियाण्यांची लागवड रविवार दि.17 जुलै रोजी करण्यात आली. द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्सक्लब डिस्ट्रिक्ट 3231-2- रिजन थ्री झोन टू च्या मार्गदर्शनाखाली लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या वतीने खांब विभागातील मौजे चिल्हे व तळवली येथील जंगल व डोंगर भागात जंगली व विविध प्रकारच्या संकलन केलेल्या वृक्षांच्या बियाण्यांची लागवड करण्यात आली विशेष यात शिवणी, एरंड,करंज,पिंपळ,साग,बीटी,काजू,आंब्यांची बाटी आशा विविध प्रकारच्या झाडांच्या बियाण्यांची लागवड यावेळी करणयात आली. यावेळी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचे अध्यक्ष डॉ. सागर सानप, रविंद्र घरत, पराग फुकणे, रविंद्र लोखंडे, डॉ श्यामभाऊ लोखंडे, गजानन बामणे, अलंकार खांडेकर, भरत महाडिक, नंदकुमार कळमकर, दिनकर सानप, पूजा लोखंडे, विश्वास निकम, दिनकर महाडिक, रेश्मा मरवडे, रामचंद्र बामणे आदींनी बियाण्यांची लागवड केली.