ओढ्यांच्या काठावर प्लॅस्टिकचे प्रदूषण

| माणगाव | वार्ताहर |

गेल्या संपूर्ण दोन आठवडे पावसाने सर्वत्र जोरदार वर्षाव केल्याने जिल्ह्यातील सर्व ओढे व नद्या यांना पूर आला होता. यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. दोन दिवसांपासून संततधार पावसाने उसंत घेतली असल्याने पावसाचे पाणी ओसरत आहे. मात्र या ओसरत्या पुरासोबत नदी, ओढे काठावर, रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग दिसत असून यामध्ये प्लॅस्टिक व इतर टाकाऊ वस्तू मोठया प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामूळे पर्यावरप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. नद्या या जलाचे स्रोत आहेत. त्यांच्या काठावर पुराच्या पाण्याने प्लॅस्टिक कचरा मोठया प्रमाणात वाहून आला आहे.

या वर्षी धुवांधार पडलेल्या पावसाने अनेकदा जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले होते. अनेक गावातून, शहरातून पुराचे पाणी शिरले होते. या पाण्यासोबत गाव, शहरातील कचरा नद्या, नाल्यात वाहून आला आहे. पावसाळा कमी झाल्याने नद्या, नाल्यांचे काठ उघडे पडले आहेत.या उघड्या काठावर व झाडीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक चा कचरा अडकलेला दिसून येत आहे.

पुरात मोठया प्रमाणात प्लास्टिक वाहून आले आहे. आता पाणी ओसरल्यावर हा कचरा व प्लास्टिक दिसत असून यामुळे नद्यांची जैवविविधता धोक्यात येईल. प्रदूषणात वाढ होईल. पिण्याच्या पाणी यामुळे दूषित होईल.

राहुल दसवते, पर्यावरणप्रेमी, माणगाव

पाऊस कमी झाल्याने पुराचे पाणी कमी होत आहे. मात्र नदी काठी, ओढ्यात मोठया प्रमाणात प्लॅस्टिक कचरा वाहून आल्याने काठ प्रदूषित झाले आहेत. हे दृश्य ओंगळवाणे असून याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

प्रा. हर्षल जोशी, निसर्गप्रेमी
Exit mobile version