| पनवेल | प्रतिनिधी |
कोकण म्हाडाचे मा. सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरण, मनोरंजन आणि सन्मान यांचा सुंदर संगम ठरणारा ‘न्यू होम मिनिस्टर’ हा विशेष कार्यक्रम खारघर येथे पार पडला आहे.
घर आणि समाज या दोन्ही आघाड्यांवर आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या मातृशक्तीच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गृहिणींना त्यांची नेतृत्वक्षमता, संवादकौशल्य आणि विनोदबुद्धी दाखवण्याची संधी मिळाली. यावेळी विशेष उपस्थितीत म्हणून सिनेअभिनेत्री शिवानी सुर्वे (‘देवयानी’, ‘फुलवा’ मालिका आणि ‘ट्रिपल सीट’ चित्रपट फेम), सिनेअभिनेत्री मेघा धाडे (2018: बिग बॉस मराठी विजेती), सिनेअभिनेता क्रांती नाना माळेगावकर (न्यू होम मिनिस्ट्रर खेळ पैठणीचा), आ. विक्रांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी महिलावर्गाच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि सकारात्मक प्रतिसादाने कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा संचारली. महिला भगिनींनी ज्या उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला, आपली कला, नेतृत्व आणि संवादकौशल्य दाखवले, ते खरंच प्रेरणादायी ठरले असल्याचे मत आ.विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.