रवी शास्त्री, गौतम गंभीरचा नाहक वाद
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आगामी आशिया चषक,विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची भारतीय संघाकडून जोरदार तयारी सुरु झाले आहे.आशिया चषकासाठी भारतीय चमूची निवडही झालेली आहे.या निवडलेल्या संघावरुन आता ज्येष्ठ क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु झालेले आहे.निमित्त आहे संघातील खेळाडू डावखुरा असावा की उजव्या हाताने खेळणारा.यावरुन उभयतामध्ये मतभेद झाल्याचेही दिसून येत आहे.
याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अंतिम अकरा जणांच्या संघात तीन डावखुरे फलंदाज असावेत असे वक्तव्य केले. रवी शास्त्री यांनी ही गोष्ट पहिल्यांदाच सांगितली नाही तर यापूर्वीही त्यांनी भारतीय संघात डावखुऱ्या फलंदाजीचा कमतरता असल्याचे सांगितले होते. ही पोकळी लवकर भरण्याची गरज असल्याचेही तो म्हणाला होता.
गौतम गंभीरचा विरोध
गौतम गंभीरने ही संकल्पना नाकारली. त्याने एक वेगळाच विचार समोर मांडला. स्टार स्पोट्सशी बोलताना म्हणाला की, फलंदाज डावखुरा आहे की उजव्या हाताचा हे महत्वांच नाही. खेळाडूची निवड ही फक्त त्याच्या फॉर्मनुसार झाली पाहिजे. मयावर खूप चर्चा सुरू असल्याचं मी पाहतोय. मात्र माझ्या मते ही खूप फालतू चर्चा आहे. अशी टीकाही त्याने केली.
तुम्ही खेळाडूचा दर्जा पाहता, तो कोणत्या हाताने फलंदाजी करता हे पाहत नाही. जर तुम्हाला माहिती आहे की केएल राहुल आणि श्रेयस अय्यर धावा करत आहेत तर डावखुरा फलंदाज निवडण्याची गरज नाही.फअसे तो म्हणाला.
गंभीरच्या मते डावखुरा फलंदाज इतका प्रभावशाली ठरेल असे वाटत नाही. जर तुमचे डावखुरा फलंदाज यशस्वी जैयस्वाल दर्जेदार खेळाडू असून तो फॉर्ममध्ये देखील आहे. तिलक वर्मा जर चांगला खेळत असेल तर त्याला संघात ठेवलं पाहिजे. जर अय्यर – राहुल चांगले खेळत असले तर त्यांनाही संघात निवडलं गेलं पाहिजे.अशी अपेक्षाही माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे.