पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल

पाच डबे बाहेर काढण्यात यंत्रणेला यश

| पनवेल | वार्ताहर |

गेले 24 तास युद्धपातळीवर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु त्यामुळे पनवेल स्थानक व परिसरात लांब पाल्यांच्या गाडयांना थांबविण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल झाल. रेल्वे प्रशासनासह पनवेल शहर पोलीस, रेल्वे पोलीस व विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन प्रवाशांच्या अल्पोपहाराची सोय केली.

रुळावरून घसरलेले पाच डबे बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आले आहे. तसेच तुटलेले ट्रॅक बदलण्याचे कामसुद्धा वेगाने सुरू आहे. रोह्याकडे जाणारी एक लेन काल रात्री उशिरा सुरू केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरात जेएसडब्ल्यूमधून स्टील कोर रोल घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे काल पाच ते सहा डबे रुळावरून घसरले होते. यामुळे कोकण रेल्वे वरील पनवेल स्थानकातून होणारी वाहतूक जवळपास थांबली होती. तसेच लांब पल्ल्याच्या गाडयांचा सुद्धा खोळंबा झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाची फौज या ठिकाणी दाखल झाली. दरम्यान, या अपघातानंतर मेल, एक्स्प्रेस रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे अनेक गाड्या या ठाणे, पुणे येथून दुसऱ्या मार्गिकेकडे वळवण्यात आल्या आहेत. तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत, तर काही रद्द करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version