पीएनपी बी.एड. महाविद्यालयाचा छात्रसेवाकाल संपन्न

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी बी.एड महाविद्यालयाचा छात्रसेवाकालचे दि. 3 ते 15 जुलै रोजी पीएनपी माध्यमिक विद्यालय वेश्वी येथे आयोजन करण्यात आले होते. दि. 15 जुलै रोजी या छात्रसेवाकालचा समारोप सोहळा संपन्न झाला.

या छात्रसेवाकालात बी.एड च्या छात्रसेवकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना समारोप सोहळ्यामध्ये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पीएनपी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पीएनपी बी.एड महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य नितेश मोरे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी सहस्रबुद्धे हिने केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता सरावते यांनी केले. दिपाली बांगारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्याचप्रमाणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच बी.एड.च्या शिक्षक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बी.एड. छात्रसेवाकालच्या मुख्याध्यापिका कश्मिरा हजारे व उपमुख्याध्यापिका कल्पना यादव यांनी केले. या कार्यक्रमासाठी बी.एड चे प्रशिक्षणार्थी, शाळेचे विद्यार्थी तसेच बी.एडचे कर्मचारी वृंदसुद्धा उपस्थित होते.

Exit mobile version